स्वर येतो कानांवर
स्वर येतो कानांवर

1 min

213
सुखाच्या वाटेवर, उभी काटेरी पाबंर
बोचतात फार, वेदनेचा कहर।
नागमोडी वळणांवर ,दाट झुडपांची वर्दळ
मज वाटते, ते धोक्याचे वळण।
मोकळ्या आकाशात, विहंग गाते मधुर गाणी
अपुल्या या मुक्त कंठानी।
तसे,
माझे मन पिंपळाच्या पानांवर
बुद्धम शरणंम गच्छामि, मंजुळ मृदू स्वर
मज येतो कानांवर।।