गजल
गजल


कधी येतो, कधी जातो, कशासाठी
वेळीअवेळी येणे ,कशासाठी।। धृ
तुझे गोड हसणे सांगून गेले
पून्हा, पून्हा, रागावणे, कशासाठी।
अबोला जराहि, ठेवला माझ्यावरी
मला तुझे बोलावणे, कशासाठी।
वेळ आहे एकांतात भेटण्याची
तरी ही तुझे हे, टाळणे, कशासाठी।
उगाच डोंगर पोखरणे, बिनकामाचे
बाहुलीचा खेळ, खेळणे, कशासाठी।।
भरोसा जरा प्रेमावरी असुदे ना
उगी जिवाला जाळणे, कशासाठी।।
जन्मोजन्मी असेल आपलं काही
वडाला फेरा घालणे, कशासाठी।
इरादा तूझा नेक होता, मला गुंतवण्याचा
तूझे हे मौन पाळणे ,कशासाठी।।