हाच अमुचा कमजोरपणा आहे
हाच अमुचा कमजोरपणा आहे


जिथे-तिथे पैशाचा खेळ आहे
पैसे दिल्याशिवाय काम होत नाही
हाच अमुचा कमजोरपणा आहे।
माणसांना सवय जडलीच आहे
पैसा पेरायची,
मशागत केल्याशिवाय पीक येत नाही।
गरीबाला कष्टाची जाण असते
ती गरिबीची,
पैसा पेरताना दहा वेळा विचार करतो।
ज्याच्याकडे अमाप पैसा आहे
पैशाची किंमत त्याला कळत नाही,
पैशाची उधळपट्टी करतो।
काम कोणतेही, असो
कायदेशीर अथवा बेकायदेशीर
हाताळताना लाच द्यावी लागते।
हाच अमुचा कमजोरपणा आहे।।
कायदेशीर काम करताना,
दिरंगाई व मनस्ताप होत असतो
हे टाळण्यासाठी पैसा पुढे सरकावा लागतो
हाच अमुचा कमजोरपणा आहे।।