सांगायचे राहून गेले...
सांगायचे राहून गेले...
खूप काही सांगायचे होते तुला...
पण राहूनच गेले...
कुठेतरी डायरीच्या पानावर
लिहून ठेवलेले...
मनात जपून ठेवलेले
तुझ्याविषयीच्या भावना तुझ्यासमोर
व्यक्त करायच्या राहून गेले...
दुरून नेहमी तुला पाहिलेले...
दोन पावले मागे तुझ्या दरवेळी चाललेले
ते क्षण तुला सांगायचे राहून गेले...
काॅलेजमधील त्या प्रपोझ डे ला
तुला देण्यासाठी घेतलेले गुलाबाचे फुल...
आज सुकले असले तरीही
मी डायरीत जपुन ठेवलेले ते फुल
प्रिये..., तुलाच द्यायचे राहुन गेले...
तुझ्यापासुन लपवुन ठेवलेल...
तुला सोडून सर्वांना माहीत असलेले
अव्यक्त तरीही ,
मनापासून तुझ्यावर केलेलं प्रेम
तुझ्यासमोर व्यक्त करायचं राहून गेले....
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

