प्रीत
प्रीत


फुलली हिरवी पाती या दवबिंदुने
खुलले हे हृदय तुझ्या या प्रितीने
येता आठवण तुझी, काळीज हे धडधडते
ओढीने तुझ्या सारखी उचकी लागते
सुटला हा गार सकाळचा वारा
येता मुसळधार पावसाच्या धारा
अशी ये जवळ तू, भिजु दे अंग
खुलु दे तुझा गोरा गोरा रंग
दवबिंदू पातीवर कसा बसतो
स्पर्श करता गायब हा होतो
आठवण येता तु दिसु लागते
अलिंगन देण्या धावता, नाहिसी तु होते
शब्द-शब्दांत जोडतो मी कडवे
त्यात गातो मी तुझ्या प्रितीचे गोडवे
हळुच येना, जवळ तु घेना
नको आता दुरावा, मिठी तु मला देना