आपल्या दोघांच्याही नकळत
आपल्या दोघांच्याही नकळत
सखे तू आहेस खूप दूर
पार त्या क्षितीजापल्याड
तिथून तू साद घालतेस
अन् पाठवतेस चार शब्द
तुजवर कविता करण्यासाठी
तू पाठवतेस त्या नभांना आळीपाळीने
माझ्याकडे घेऊन
सूर्यास्ताची गुलाबी आभा
ती चांदणी रात्र
सप्तरंगांनी भरलेली संध्याकाळ
मोहक सुगंधी वादळ,
बरसणारे मेघ,
बेधूंद बरसणा-या सरी
अन् त्या सा-यांना बरोबर घेऊन
मी तुझ्यावरची कविता फुलवत असतो
आणि तिकडे लांब, खूप दूर
त्या माळरानावर
भरा-या घेणारे पक्षी
आपल्या प्रीतीची बाराखडी
रेखाटत असतात
त्या नभावर
आपल्या दोघांच्याही नकळत.