STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Tragedy

2  

Vasudeo Gumatkar

Tragedy

बेरोजगार

बेरोजगार

1 min
440

बेरोजगार असल्यावर

नजरा कशा छळतात

किती मोठा गुन्हा केला

अशा नजरेनं पाहतात


करत होतो जेव्हा

संघर्ष त्या यशासाठी

संकटात असताना

धावला ना कुणी मदतीसाठी


कुठे गेले होते तेव्हा

मी एकटाच लढत होतो

मिळावा पाठिंबा थोडा

म्हणून ओरडत होतो


मी जेव्हा जिंकत होतो

तेव्हा वाहवा केली

आज हरल्यावर मात्र

कशी माणसे दुरावली


वचन खरे आहे ते

सुखात सर्व आपले असतात

दुःखात मात्र सारे कशी

एकट्याला सोडून जातात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy