STORYMIRROR

Chetan Joshi

Tragedy

4  

Chetan Joshi

Tragedy

भांडवली मळा

भांडवली मळा

1 min
27.4K


पैशाचा खेळ सारा ...


भांडवली पसारा


बुड पडे ते उघडे ...


फुलला जरी पिसारा


 

चोरांचे खवळता पित्त


येथे मुक्त सांडते रक्त


डावे उजवे दावणीला


खेळ बाहुल्यांचा फक्त



पाऊस पडे मतांचा


श्वास तिथे सुटकेचा


भोपळा फुटे भ्रमाचा 


काय वाईट रे आधीचा ? 



येवो कुणीही कितीही भला


धरणार आमचाच गळा


शब्द चुकीचा हा ‘लोकशाही’


शब्द शोभे ‘भांडवली मळा’


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy