STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Tragedy

3  

Vasudeo Gumatkar

Tragedy

महापूर

महापूर

1 min
703

आजकाल पावसाचे

गणित कळत नाही

जलाने भरल्या नभांचा

रस्ता इकडे वळत नाही


पाऊस यावा म्हणून

खूप भरून येतो ऊर

कोल्हापूर, पुणे, मुंबई

येथे येतोय महापूर


पावसा तू यावे म्हणून 

डोळ्यात अश्रू दाटले

आला एकदाचा तू अन्

सर्वकाही वाहून नेले


असा तू वेड्यासारखा

का वागतोस पावसा

कोल्हापूर, मुंबई, पुणे

येथे प्रलय आणला कसा


पावसा तू आजकाल

वेगळा वागत आहे

भेदभावाची भावना

आता जाणवत आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy