STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Others

3  

Vasudeo Gumatkar

Others

श्रावण

श्रावण

1 min
237

आला श्रावण महिना

घेऊन जलधारा

झुळझुळ वाहतो

कसा हा गार वारा


पावसाच्या सरीत

मनसोक्त मी भिजतो

आठवणीत सखीच्या

थेंबांसोबत रमतो


श्रावण महिन्यात

खूप सारे सण येती

जिव्हाळ्याची नाती

भेटावयास येती


हिरवागार परिसर

श्रावणात होतो

पाहून ते सौंदर्य

रममाण मी होतो


श्रावणात येतो लाडका 

सण भाऊ - बहिणीचा

बांधून हाती प्रेमाने राखी

धागा पक्का होई नात्याचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन