STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Others

3  

Vasudeo Gumatkar

Others

पावसाचं पाणी

पावसाचं पाणी

1 min
194

रान सारं भिजलं

पावसा तुझ्या येण्यानं

सजली सुंदर धरा

गार झाली थेंबानं


आनंद पसरला

पक्षी गाती गाणी

हिरवळीने आज

सुखावले प्राणी


पेरले बळीराजाने

त्याच्या शेतात मोती

बहरेल जोमानं

पीक येईल हाती


पावसाच्या पाण्यानं

नदी नाले भरले

सागराला भेटण्या

वेगाने निघाले


मेघाने गर्जना मोठी

करता पाऊस आला

माळरान सारं चिंब

भिजवून आज गेला


Rate this content
Log in