STORYMIRROR
हायकू
हायकू
हायकू
हायकू
पाऊस येता
धरा चिंब भिजते
रूप सजते
पाऊस आला
घेऊन थंड वारा
सोबती गारा
पाऊस आला
मंजुळ गात गाणी
नभात पाणी
तो मृदगंध
सगळा पसरला
सुवास आला
श्रावणातला
पाऊस आवडीचा
आठवणींचा
More marathi poem from Vasudeo Gumatkar
Download StoryMirror App