बैलपोळ्यात मी
बैलपोळ्यात मी

1 min

211
आजही धावतो बैलपोळ्यात मी
सारखा रंगतो बैलपोळ्यात मी
सण बळीचा खरा आज आला पुन्हा
सुख नवे भोगतो बैलपोळ्यात मी
छान टोपी दिसे आज डोक्यावरी
घालुनी चालतो बैलपोळ्यात मी
रंग सुंदर दिला बैल गाईस त्या
रूप ते पाहतो बैलपोळ्यात मी
तोरणाची जरी उंच दोरी असे
मान तर राखतो बैलपोळ्यात मी