प्र
प्र

1 min

14.1K
प्र- प्रथम तुला बघण्याचा
बघून तुझ्यात गुंतण्याचा
गुंतून हृदयात बसण्याचा......
प्र- प्रत्येक तुझ्या अदांचा
लाजून गालात हसण्याचा
हसून सौंदर्य उमलण्याचा......
प्र- प्रांजळ खेळ डोळ्यांचा
तुझ्यासवे लपंडावाचा
पापण्याआड लपण्याचा.......
प्र- प्रेमळ तुझ्या अस्तित्वाचा
जवळ नसूनही माझ्या
भास जणू असण्याचा.......
प्र- अथक माझ्या प्रयत्नांचा
तुझ्यासवे जगण्याचा
आयुष्याचा स्वर्ग करण्याचा......
(३-४-१३ | स ८:२५)