STORYMIRROR

Aashish Deshpande

Romance

4  

Aashish Deshpande

Romance

राधेचे मन

राधेचे मन

1 min
22.9K


मनाचेच गुंती, मनाचेच वारे

मनाला सख्या मी कसे आवरू रे !!

मन बावरे हे, मन गुंतले रे

मनाला सख्या मी कसे सावरू रे !!1!!

मन स्वप्न झालेे, आकाश झाले

मन हे स्वता:ला विसरून गेले

मनाच्याच धुंदी बेहोश झाले

मनाला सख्या मी कसे सावरू रे !!2!!

मन लाजरे हे, तुज पाहते रे

मन हे तुला का बोलावते रे

मनाच्याच मोही मी मोहले रे

मनाला सख्या मी कसे सावरू रे !!3!!

मन हे किनारे त्या सागराचे

मन वाट झाले दूर चालावयाचे

मनाच्याच साठी मी मानले रे

मनाला सख्या मी कसे सावरू रे !!4!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance