तू
तू
तू असणेच मला सर्वकाही
तूझ्याविना मी काहीच नाही
जग हे सुने भकास होईल
प्रिये तू जर सोबत नाही
मनातले भाव तुझ्या तू
आधीच का सांगीतले नाही
वाट किती पाहिली तुझी गं
पण तुला ते कळलेच नाही
प्रेम तुझे आहे माझ्यावर
जरी शब्दांनी वदले नाही
सांगणे हे तव स्पर्शाचे
मनात आपल्या अंतर नाही

