पाहिले जेव्हा तुला
पाहिले जेव्हा तुला
पाहिले जेव्हा तुला मी
मोहूनी गेलो पुरा...
ऐकली ह्रदय स्पंदने अन्
स्तब्ध झाली ही धरा..!
तू मृगनयनी कोमल काया
रचिता ब्रम्हा अन् तू माया
पाहुनी तव मुखचंद्रमा
चंद्रही झाकोळला जरा ...!! 1!!
पाहिले जेव्हा तुला मी....!
मादक बांधा मंजुळ वाणी
अप्सरा जणू इंद्रभुवनी
वर्णू किती सौंदर्य तुझे मी
हे शब्द थिटे पण भाव खरा...!!2!!

