करू या होळी कोरोनाची
करू या होळी कोरोनाची
एक वर्षाचा कालावधी झाला
कोरोनाचे सावट नाही सरले
खूप काही सर्वांनी गमावले
कोरोनाने नको करून सोडले....१
आला होळीचा सण आनंदाचा
एकमेकांना द्यायचा घ्यायचा
पुरे झाले नखरे ह्या कोरोनाचे
आता त्यालाच होळीत टाकायचा....२
नियमाचे पालन नीट करावे
पुन्हा पुन्हा हात धुवायचे
मास्काचा वापर करायचा
सोसिल डिस्टन्स पाळायचे.......३
डॉक्टर्स, परिचारिका पोलीस
लोकांना देवून सर्विस थकले
महारोग कोरोना काही जाईना
लहान थोर सगळ आता वैतागले.....४
आजच्या शुभ होळीच्या दिवशी
करोनाचे करू एकजुटीने दहन
राग, क्रोध, मत्सर सगळे पेटवू
होळीच्या आगीत टाकू प्रश्न गहन.....५
कळकळतीची विनवणी करू या
होलीका देवीला आजच्या दिवसाला
सुख चैनीचे जीवन लाभो सकल जना
सांगू भस्म कर आता ह्या कोरोनाला....६
