घर
घर
निळया आभाळा खाली चुल ही मांडली.
उघड़या वर संसार आमचा नाही वाली कोणी.
अंग भर शुभ्र चांदणे लेवुन,आभाळाचे पांघरून.
गार वारा झोंबतो अंगाला झोपतो तसेच मूडपुन.
पोटासाठी दाही दिशा आम्ही करतो वणवण.
गरजे पुरती भांडी आणि फाटकी वस्त्र .
गरीबाचा नाही वाली कोणी हेच एक सत्य.
सोबतीला गुरे ढोरे , गावोगाव भटकणे.
जावू तिथे चुल मांडू हेच आमचे जिणे.
भीती नाही अंधाराची,ना तमा पावसाची.
उन्हाच्या झळा सोसतो ,काहिली होते जीवाची.
जरी जन्मलो आम्ही गरीबा घरी,
मनाने असु श्रीमंत तुम्हा लोका परी.
