प्रिती आठव
प्रिती आठव
मावळतीचा सूर्य करी प्रीतीआठव
बरसात किरणांची अन् डोळा आसव .. 😢
आठवणीतले पक्षी नयनात स्थिरावले .. ..
झुळुक हळव्या वार्याची स्पर्शुन मन ओले..
चिंब पावसाळी संध्या होई चांद ही धुंद..
मावळतीचा सूर्य करी प्रीती आठव
बरसात किरणांची अन् डोळा आसव ..
कुठूनशी येती ही विसरल्या गावची ओळख
भाव कोन्दल्या नदीच्या काठावर बसून शांत
क्षितिजाचे पहिले स्वप्न जणू ओठी गुणगुणत..
मावळतीचा सूर्य करी प्रीती आठव
बरसात किरणांची अन् डोळा आसव .. .
स्मरण नित्य तुझे श्वास आणिकच अधीर
दिव्यासवे वात ही जळे मन ही भरूनी येई
तळमळतो जीव इथे एकाकी संध्या समयास..
मावळतीचा सूर्य करी प्रीती आठव
बरसात किरणांची अन् डोळा आसव ..
भाळतो पुन्हा तुच होत सोबती ही
जागतो माझ्यासवे त्या बेधुंद रात्री ..
चंद्र माझ्या नभीचा तुझ्यासाठी आतुर..
तरीही रविच्या विरहाचे दुःख दाटे अंतरी..
मावळतीचा सूर्य करी प्रीती आठव
बरसात किरणांची अन् डोळा आसव .. 😢

