प्रेम विरह
प्रेम विरह
कातरवेळी रे या अशा,
सतावती रे सख्या
काळीज माझं सुनंसुनं
ओढ तुझी जिवा
लागे मना हुरहूर
साद सुराचा मेळ घालतो आहे
नाहीस तू आता जिवलगा,
चुक कुठली बघ तुझी न माझी
सांग कुठे लोपली ती गुलाबी स्वप्ने
हात तुझा असा हाती भासतो आहे
मळभ हा दाटला कसला,
भेट सांग तुला मला
का अशी विरहाची,
चंद्र कोरीला ग्रहण कसले,
सांग चांद पुनवेचा
ऊगवणार आहे
सडा प्राजक्ताचा अंगणी ताऱ्यांचा
कुठेस रे तू शुक्रतारा नभातला
उरले न बघ मी, माझीच आता
चांद करून ओंजळीचा,
तुला रे शोधत आहे,
तू चकोर माझा
चांद आहे पुनवेचा
तुझ्याविना न दुसरे मागणे काही
प्रतिबिंब नव्याने शोधतो आहे
