रोटी कपडा और मकान
रोटी कपडा और मकान


चालली होती पायपीट
सूर्याची त्यांना सोबत होती
फाटकी कापडं गुंडाळून ती
लेकराच्या अंगावर नुसती चड्डी होती
हातात वाळलेला भाकर तुकडा
प्यावयास फक्त आसवे होती
दमून दमून लेकराची
नुसतीच हाडे राहिली होती
ओकत होता आग तो
मातीत पाये पोळत होती
रस्त्या काठची झाडे आता
त्यांच्यासाठी छप्परं होती
ऊन तहान भुकेनं
लेकरू नुसतं व्याकुळ झाल
जगण्यासाठी च्या झुंजीमध्ये
तान्हं शेवटी हरल
आईच्या कुशीत शेवटचं
पिल्लू ते शांत निजलं
त्याला वाचविण्याची धडपड तिची
मात्र काळीज ना कुणाचं द्रवल
येणाऱ्या जाणाऱ्या वाहनास ती
हात जोडून थांबवत होती
कोरोणाची भीती त्यांना
अवस्था लेकराची ना दिसत होती
फोडला तीनं हंबरडा
भेट शेवटची लेकराची
दगड ठेऊन काळजावर
नदीकाठी दिली माती
पुसली तीनं आसवे
वाट पुढची धरली होती
रोटी कपडा मकानाची
पायपीट निरंतर सुरू होती...!