सारे तुझे तुला तर
सारे तुझे तुला तर
सारे तुझे तुला तर माझ्यात काय उरते
वेडावली नदी की त्या सागरास मिळते
गिरवून अक्षरांना त्या पाहिले नव्याने
यमकात गुंफलेली कविता अशीच स्मरते
रागावली म्हणूनी रागे कुणी न भरतो
दिसताच माय दारी पदरात बाळ शिरते
हा ऊन पावसाचा सारा प्रवास येथे
चुकलेच ना कुणाला हे चक्र असेच फिरते
त्या दोन चांदण्यांनी आकांत आज केला
गल्लीत काजव्यांच्या लटकून चांद दिसते
✍🏻 पूनम वानकर (पूरवा)
