जे झाले ते तर व्हायचेच होते
जे झाले ते तर व्हायचेच होते
जे झाले ते तर व्हायचेच होते
तिलाही मला टाळायचेच होते
लाडू, जिलबी माझ्या आवडीची फार
म्हणून तिला तिच्या लग्नात मला बोलवायचेच होते
जे झाले ते तर व्हायचेच होते...!
खेळलो रंग होळीचा कितीदा
लाल, गुलाबी, निळा नि पिवळा
ठेवून पत्रिका लग्नाची हाती
तिला तोंड माझे काळे करायचेच होते
जे झाले ते तर व्हायचेच होते...!
उभी बोहल्यावरी दिसे काय छान
हाती बुके गळयांत फुलांची माळ
नवऱ्यास म्हणे देते ओळख करुनी तुमची
अन् मला मानलेला भाऊ म्हणायचेच होते
जे झाले ते तर व्हायचेच होते...!
किती वर्ष्यांनी पुन्हा दिसली दारी
केसांत गजरा ओठांवरी लाली
पदराआड उभी दोन मुले खुळी
त्या लेकरांनाही या मामासंग खेळायचेच होते
जे झाले ते तर व्हायचेच होते...!!
