जिंदगी
जिंदगी
थोडं थोडं हसू
कधी थोडंसच पाणी
चिमूटभर जिंदगीची
मूठभर कहाणी...!!
कधी तापली चुलीवरती
कधी सावली वटवृक्षाची
कधी निसटली वाळू जैसी
ओंजळीतूनी सुख-दुःखाची
थोडी थोडी वेडी
आणि थोडीशी शहाणी
चिमूटभर जिंदगीची
मूठभर कहाणी...
थोडं थोडं हसू
कधी थोडंसच पाणी
चिमूटभर जिंदगीची
मूठभर कहाणी...!!
कधी उमलली ओठांवरती
कधी फाटक्या नशिबासम ती
कधी पानगळ शिशिराची
अन् , कधी वसंताची ही गाणी
छोट्या मोठया गोष्टी
हिच्या शंभर गाऱ्हाणी
चिमूटभर जिंदगीची
मूठभर कहाणी..
थोडं थोडं हसू
कधी थोडंसच पाणी
चिमूटभर जिंदगीची
मूठभर कहाणी...!!
✍️ पूरवा
