निशिगंध साजना तू
निशिगंध साजना तू
1 min
207
हलक्याच चुंबनाने बेधुंद साजना तू
रात्रीस मोहरे जो निशिगंध साजना तू
कक्षा तुझ्या निराळ्या कैफात मी तरीही
रोखू कशी तुला रे स्वच्छंद साजना तू
प्रेमात पावसाच्या मी कैकदा नहाले
ओल्या तनास माझ्या मृदगंध साजना तू
श्वासास ओढ लावी की खूळ हे मनाचे
प्यावे नि तृप्त व्हावे मकरंद साजना तू
देहात रूजलेला जो दरवळे मुरूनी
सुटलाय अत्तराचा तो गंध साजना तू