आता पुरे बहाणे झाले!
आता पुरे बहाणे झाले!
1 min
10
आता पुरे बहाणे झाले
भेटूनही जमाने झाले
ज्या ठेवील्या स्मृती जपूनी
बघ त्यांचेही तराने झाले
सुनाच तो किनारा आता
सूनेच हे नभ चंद्रावीन
आता कळाले प्रेमात मज
का इतिहासजमा दिवाने झाले
हा देठ केशरी प्राजक्ताचा
की रंग असावा दुराव्याचा
मी पुरता ज्यात होळपळलो
जणू परवान्यांचे माझे घराणे झाले