STORYMIRROR

kishor karanjkar

Romance

5.0  

kishor karanjkar

Romance

अव्यक्त प्रेम

अव्यक्त प्रेम

1 min
1.0K


प्रेम आहे माझ्यावर तर व्यक्त का नाहीस करत

नुसतच जगाला दाखवून नाही ते कधी ठरत.....


मला माहितेय....

तुझं चोरून माझी प्रोफाइल बघणं

आणि पडद्या आडून पोस्ट करणं

माझी आठवण येत नाही हे दाखवणं

माझ्याशिवाय तुला न करमण


प्रेम आहे माझ्यावर तर व्यक्त का नाहीस करत

नुसतच जगाला दाखवून नाही ते कधी ठरत.....


मला माहितेय....

ऑफिस मध्ये असताना तुझं असच करणं

सामोरी आलीस तरी नजरेनं मारणं

आणि मी नजर भिडवल्यावर

माझ्याकडे तू बघतच नव्हती हा आव आणणं


प्रेम आहे माझ्यावर तर व्यक्त का नाहीस करत

नुसतच जगाला दाखवून नाही ते कधी ठरत.....


मला माहितेय....

तुझं प्रेम आहे माझ्यावर हे तुला जाणवून द्यायचं

व्यक्त न करताच तुला ते मनातच ठेवायचं

आयुष्यभर मला फक्त झुरत ठेवायचं

आणि कृष्णची राधा बनून तुला राहायचं.....


प्रेम आहे माझ्यावर तर व्यक्त का नाहीस करत

नुसतच जगाला दाखवून नाही ते कधी ठरत.....




Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance