जेव्हा तू आलीस तेव्हा
जेव्हा तू आलीस तेव्हा
1 min
1.0K
जेव्हा तू आलीस तेव्हा,
रंगछटा पसरूनि भरला आसमंत सारा
पाहताच लाली गालावरची तुझ्या
मधाळला सांज गारवा
जेव्हा तू आलीस तेव्हा,
काळोखात हरवल्या पायवाटा
गहिऱ्या डोळ्यात विरघळल्या तुझ्या
काळोखाच्या काजळ रेखा
जेव्हा तू आलीस तेव्हा,
उगवला चंद्र अन दिसला काजवा
ओंजळीत भरून चांदण्या तुझ्या
उधळून टाकाव्या गात राग मारावा
जेव्हा तू आलीस तेव्हा,
जीव माझा थंडावला
आलेला शीन सारा मोहरून गेला
तुझ्याच मिठीत विसावला......
