STORYMIRROR

kishor karanjkar

Fantasy

2.7  

kishor karanjkar

Fantasy

चार निवांत क्षण मिळावेत

चार निवांत क्षण मिळावेत

1 min
32.4K


आयुष्यात आता धावुन धावुन थकलोय,

चार निवांत क्षण मिळावेत अशी जागा शोधतोय


होती कधी ती जागा गंगेच्या काठावर,

शेतातल्या बांधावर आणि सोमेश्वराच्या पारावर,

मन माझ अजुनही तिथेच रमतय

चार निवांत क्षण मिळावेत अशी जागा शोधतोय


सुर्योदय कधी होता माझा सुर्यास्तही होता माझा,

पौर्णिमेचा चंद्र अन् घड्याळाचा काटा

आजकाल मात्र भाकरीचा चंद्र फक्त शोधतोय

चार निवांत क्षण मिळावेत अशी जागा शोधतोय


कधी तरी जीव रमतोय ऐकून हरवली गाणी,

तरी मन नाही रमत गड्या गावच राहतंय मनी,

पाटातल्या पाण्यासारखं आठवनीचं पाणी वाहातंय

चार निवांत क्षण मिळावेत अशी जागा शोधतोय


आयुष्यात सगळी कामे संपवून येईल परत मी शोधत माझी माती,

तेव्हा मात्र विसरु नका पाखरांनो आपली नाती,

आयुष्यात परत ते क्षण येणार ह्याच आशेवर मी जगतोय

चार निवांत क्षण मिळावेत अशी जागा शोधतोय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy