STORYMIRROR

kishor karanjkar

Romance

4  

kishor karanjkar

Romance

प्रिया माझी बावरावी

प्रिया माझी बावरावी

1 min
292

गालावरची बट तुझ्या

हाताने सावरावी

नाजूक स्पर्शाने त्या

प्रिया माझी बावरावी


लाजून चूर त्या पापण्यांची

हालचाल नाजूक व्हावी

लाजेच्या त्या चाहुलीने

प्रिया माझी बावरावी


ओठांची ती थरथर

ओठांनीच थांबावी

नकळत चुंबताना त्यांना

प्रिया माझी बावरावी


संध्याकाळ संपता संपता

भेट ती सरता सरता

विरहाच्या त्या चाहुलीने

प्रिया माझी बावरावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance