STORYMIRROR

kishor karanjkar

Classics

4  

kishor karanjkar

Classics

आज इकडेपण पाऊस आला

आज इकडेपण पाऊस आला

1 min
267

आज इकडेपण पाऊस आला

फरक एवढाच

तिकडचा ओळखीचा

इकडचा अनोळखी


पावसात हरवलेल्या होत्या पाऊलवाटा

फरक एवढाच

चालताना त्या ओळख दाखवून सोबत करायच्या

अन इकडच्या हसून ओळख विचारायच्या


पावसाच्या धाराही जरा वेगळ्याच होत्या

फरक एवढाच

तिकडच्या अल्लड मुली सारख्या बरसायच्या

इकडच्या गोऱ्या बाईच्या शिस्तीसारख्या


पावसाचा चिखल इकडेही होता

फरक एवढाच

तिकडचा पोळ्याला तो कधी हातात यायचा

इकडे बुटाला लागला तरी वैताग करायचा


आज इकडेपण पाऊस आला

फरक एवढाच

तिकडचा जुन्या आठवणी सोबत घेऊन येणारा 

इकडचा,

तिकडच्या पावसाच्या आठवणी सोबत घेऊन येणारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics