STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Romance

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Romance

साजन पाऊस

साजन पाऊस

1 min
108

रिमझिम बरसे मेघातूनी काळ्या

पहिला - वहिला आला पाऊस

नटली अवनी नववधू सम

प्रियवर झाला साजन पाऊस...!


स्पर्शाने त्याच्या , दरवळून उठली

आसक्त जणू ती वेडी धरणी

चुंबुनी तिजला हजारदा तो

बरसण्या आतुर वेडा पाऊस...!


मोर पिसारा फुलवूनी नाचे

ढगाचे ताशे डमडम वाजे

वीज चमकूनी ताकीद देई

थाटामाटात आला पाऊस...!


छप्परे न्हाली झेलीत धारा

सोसाट्याचा सुटला वारा

व्याकुळ चातक तृप्त होई

सरी घेऊनी आला पाऊस...!


बहरुनी उठली शेत शिवारे 

वाऱ्यासम डोले , गायी गाणे 

प्रेमऋतू तो नवा उमलुनी  

नवचैतन्यही झाला पाऊस...!


पानांवरती , फुला - फुलांसी

बिलगुनी बसला हसरा पाऊस

गवतांची ही तळवे भिजली

असा बिलगला त्यांना पाऊस..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract