रातराणी तू सखे
रातराणी तू सखे
रातराणी तू सखे मी धुंद वेडा पावसाळा
चुंबता तुज शांत व्हावा या मनाचा हा उकाळा
ही अबोली आज भिजली लाजली गाली कशाला?
या सरिंचा तोल जातो बरसताना मेघ काळा
सांग तुजला काय देऊ प्रेम वेड्या या क्षणाला
चांदण्यांनी बघ सजवला या दिलाचा मी अटाळा
स्पर्शता तुजला सखे हा तृप्त होतो गार वारा
मोकळ्या केसांस रिझवी दरवळूनी फूल माळा
ऐक राणी आज माझी स्पंदने थेंबांतुनी या
पांघरूनी एकमेका संपवू या हा उन्हाळा

