STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Others

4  

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Others

गेले दिवे विझूनी

गेले दिवे विझूनी

1 min
280

अभ्यास माणसांचा मी पाहिला करूनी

शोधात आपल्यांच्या पणतीस पेटवूनी


एकेक पान होते माझ्याच माणसांचे

दावून पाठ गेले मी पाहता वळूनी


होते सुखात जेव्हा सांगे बड्या खुशाली

दुःखात मग कळाले गेले किती पळूनी


अंधार सारताना मज साथ काजव्यांची

वाटेत पेटलेले गेले दिवे विझूनी


आकाश तारकांनी होते नटून वेडे

तो चंद्र रूसलेला गेला कुठे निघूनी?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract