STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Classics

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Classics

दिसतो न चंद्र कोठे

दिसतो न चंद्र कोठे

1 min
170

दिसतो न चंद्र कोठे सारे ढगाळ आहे

निजवून तारकांना झाली सकाळ आहे


प्राजक्त सांडलेला हा पाहतो वळूनी

स्पर्शून त्यास गेला वारा खट्याळ आहे


हृदयास भेदणारे छोटेच शब्द होते

जख्मा करून तेही झाले मवाळ आहे


दुःखात मंद वारा हा वाहतो कुठूनी?

का सारखे तयांचे डोई कवाळ आहे


डोळ्यात आसवांनी गर्दी उगाच केली

प्रेमात जे मिळाले विषही मधाळ आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract