STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract

होईल मरण सस्ते

होईल मरण सस्ते

1 min
157

कुरवाळता व्यथेला का वेदनाच हसते?

जगणे कठीण आता होईल मरण सस्ते


सोडून माणसाला धुंडाळतो शिवालय

दगडात सांग वेड्या थोडीच देव वसते?


निवडुंग आणला तू तोडून आज येथे

काट्यात हासणारे सारे गुलाब नसते


गंधास चंदनाच्या तू भाळला परंतू

गावात कावळ्यांच्या जातात हेच रस्ते


ती लाजली म्हणूनी काळीज आणले तू

प्रेमात आंधळे जग सारे तिथेच फसते


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Abstract