STORYMIRROR

Vijay Sanap

Romance

3  

Vijay Sanap

Romance

राघू मैना

राघू मैना

1 min
1.8K



आमराई बनामधी

राघू मैनेची ती जोडी

पाड दिसता झाडाला

चाखे अमृताची गोडी ।।


नका ठेऊ पिंजऱ्यात

घेऊ मोकळाच श्वास

फिरु वनात जोडीणे

खाऊ सुखाचा रे घास ।।


सारा निसर्ग फुलला

फळे मिळता वेगळी

येतो मोहर फुलून

प्रित आमुची आगळी ।।


रानी हिरव्या झाडीत

राघू मैना राजा राणी

शाही भोजनाची चाले

मनसोक्त मेजवानी ।।


एक ताट एक घास

दोघे बिलगे पाडाला

घेती फळाचा अस्वाद

मिळे आनंद जोडीला ll


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance