STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Romance

3  

Sanjay Raghunath Sonawane

Romance

प्रेमवेडी -संजय रघुनाथ सोनवणे

प्रेमवेडी -संजय रघुनाथ सोनवणे

1 min
463



तू येण्यासाठी मी आतूर झाले

तुला पाहण्यासाठी मी स्वप्नात रंगले

तुझ्या प्रेमात मी वेडेपिसी झाले

तुझ्या स्पर्शाने मी आज सुखावले


नाते तुझे माझे कसे अवचित जडले

नकळत तू माझा झाला हे मी ओळखले

लांबसडक केसावर जडली तुझी माया

मनापासून तू अर्पिली रे काया


तूच आहेस सर्वांसाठी खरा प्रेमळ

तुझ्या भावना आहे माझ्यासाठी निर्मळ

कुणी कितीही जळू दे होणार नाही काही

तुझ्याशिवाय दुसऱ्याची मी होणार नाही


तूच माझा सखा, तूच प्राणनाथ

तू माझा जीवलग ही तुला शपथ

मी नाही लोभी फक्त फायद्यासाठी

जगाचा उद्धारकर्ता ही श्रीमंती माझ्यासाठी


प्रेम माझे आहे तुझ्यावर खरे हृदयापासून

होणार नाही वेगळी मी तुझ्या मनातून

नाती मनामनाची, सात जन्माची

अशीच राहो भावना दोन जीवांची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance