STORYMIRROR

Sachin Naik

Romance

4.0  

Sachin Naik

Romance

पिंपळपान

पिंपळपान

1 min
1.9K


आज अचानक तिच्या आठवणीने

डोळे थोडे नम झाले

परि पुस्तकातील पिंपळपानाने

गम थोोडे कम झाले


पुन्हा गुंंतलो त्या रम्य आठवणीत

पावसाला ह्या नयनी साठवित

सुने सुने हे जीवन जगवीत

एकटाच जगतो मी तिला आठवीत

कॉलेजच्या पहिल्या वर्षाला

तिची नी माझीभेट जाहली

गाठी भेटी होता होता

मनी प्रितीची

पालवी फुटली


तिच्या शिवाय आता काही सुचेना

तिला पाहताच मन कळी उमलू लागे

सानिध्यात तिच्या

दिवसच्या दिवस जाऊ लागले

तिच्या शिवाय जिणे आता

अवघड हे वाटू लागले

प्रेमाच्या त्या घेऊनी शपथा

चुंबीतो मी तिचा माथा


अशी ह्या नात्याला द्रुष्ट लागली

अवचित कशी ही वेल करपली

दुर्धर त्या कँसरच्या रोगाने

प्रिया माझी नभात शिरली

एकटाच ह्या जगी मी आता

तिच्या आठवणीत रमतो


अन मन उदास झाले कि

पुस्तकातील पिंपळपान बघतो

बस्... एकच इच्छा मनी आता

कि पुढील जन्मी तरी भेट घडो

अन ..समाधीवर माझ्या या

पिंपळ पानांंचा सडा पडो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance