स्वप्न
स्वप्न
स्वप्न सुंदरी स्वप्नामध्ये येऊन गेली
रात्रभर मला छळून छळून गेली
स्वप्नातच तिचे ते जवळ येणे, बिलगून बसणे
मी चुंबन देताच तिचे ते आरक्त होणे
स्वप्नातील ही प्रणयक्रिडा, हा श्रुगार
स्वप्न बनूनच राहणार
स्वप्नातील स्वप्नसुंदरीला
सत्यात मी नाहीच आवडणार
कुठे ती इंद्राच्या दरबारातील अप्सरा
आणि मी........... हा असा वेडा
तरी वाटते स्वप्नातील प्रियेला
एकदा आपले मनोगत सारे सांगावे
तुझ्या विना माझे सारे
सुने सुने हे जीवन आहे
........
" स्वप्नातच तीज घेऊन यावे
अन स्वप्नातच मन रमवावे
स्वप्नात स्वप्नाचे स्वप्न बघावे
सत्यात स्वप्नाला जागा नसे "
