शोक
शोक
धडाम धूम ssss
बस एकच आवाज अन....
अन हजारोंं स्वप्नाचा चुराडा
शेकडो जिवांची राखरांगोळी
अरे मुर्खांनो, हिंसेने का कधी
कुठले प्रश्न सुटले आहेत
जरा इतिहासात डोकावून पहा की
जगातील एकही प्रश्न हिंसेने सुटलेला नाही
पण मी तुमच्याकडे इतिहासाबद्दल
काय बोलतोय, अरे तुमचा आणि
इतिहासाचा संबंधच काय !
तुम्ही तर माथेफिरू माणसं
कुणाच्या तरी चिथावणी वरून
धर्माचा बागुलबुवा निर्माण करून
अन देशद्रोही बांधवांना हाताशी धरून
निरपराध नागरिकांचे प्राण घेणाऱ्यांंनो
तुुम्हाला ना धड तुमच्या देवाच्या
दरबारात जागा मिळेल
ना ही स्वधर्मीयांच्या मनात स्थान मिळेल
मिळतील फक्त विधवांचे अन अनाथांचे
' घोर शाप '
पण हे शाप भोगणारे तुम्हीच नसाल
तर ते शेंबडे राजकीय नेतेही
जे, डरपोकपणाला आणि मतांंच्या राजकारणाला
सर्वधर्मसमभावाचे नाव देऊन आपल्याच
नागरिकांना बेवारस करीत आहेत
या अनाथांचे शाप वाया नाही जाणार
आणि तुमची पुढची पिढी महाजनी निपजणार
जो पित्याच्या अस्थी विसर्जनाचा विधी
शँँपेन आणि कोकेन पिऊन साजरी करणार
अन ही तर सुरूवात आहे
आणि रात्र ही वैर्याची आहे
चला मिळून 'हम एक है ' चा मंत्र जपू
सर्वधर्मसमभाव चूलीत जाळू
देशाच्या गद्दारांंना चांगला धडा शिकवू
अन शत्रूचा निःपात करू.
