STORYMIRROR

Sachin Naik

Tragedy

2  

Sachin Naik

Tragedy

फूसका बार

फूसका बार

1 min
482



दिवसामागून दिवस चालले

कळत नसे मजला, मी का जगत असे


अरे अपमान तरी किती सहन करायचे

संयम तरी किती पाळायचा, की आपल्या

नशिबात ती नाही हे समजून गप्प बसायचे


काही कळेना , काही सुचेना

एक मन सांगू लागले

सोड करणे व्यर्थ आक्रोश

हे मूक रडणे थांबव

ह्या प्रेमाच्या नशेपेक्षा

त्या मदिरेची नशा चाख

अरे , तुझ्या प्रियेसारखी

ही कधीच तुला एकट टाकून जाणार

नाही, की अंतर देणार नाही


अन् दुसरे मन म्हणू लागले

अरे जीवन म्हणजे काही फक्त

प्रेमच आहे का आणि प्रेम म्हणजे फक्त

एखादी गोष्ट मिळवण, आपली

होण एवढचं आहे का ?

अरे त्यागात सुद्धा प्रेम आहे

स्वतःला तू अहिंसेचा पूजारी समजतोस

महात्म्याचा भक्त समजतोस

मग धीर धर, मौन पाळ, संयम ठेव


अन् एके दिवशी ……..

त्याच्या हाती एक लग्न पत्रिका पडली

व त्या दिवसापासून तो गल्लीतल्या

दारूवाल्याचा कायमचा गिर्हाईक झाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy