STORYMIRROR

Sachin Naik

Others

3  

Sachin Naik

Others

कर्ण

कर्ण

1 min
1.2K


‘मी कोण’ ह्या प्रश्नाचे उत्तर शोधत

आयुष्य काढल

आणि ‘मी असा का वागलो’ हा प्रश्न ठेवून

मी म्रुत्युला कवटाळल


कुंती सारख्या भावी सम्राज्ञीच्या

कुतूहलापोटी मी जन्माला आलो

आणि कुतूहल क्षमण्याआधी

नशीबाच्या फेर्यात अडकलो


ज्या साम्राज्याचा सम्राट म्हणून रहावयाचा

अधिकार होता, तिथे सुतपूत्र म्हणून राहिलो

असंगाशी संग केला व उपकाराच्या ओझ्याखाली

दुर्योधनासारख्या मित्राला आपल आयुष्य वाहिल !


द्रौपदी सारख्या सतीचा

भर सभेत कुलटा म्हणून

अपमान केला आणि

सार्या स्त्रीजातीचा शाप वाहिला


आयुष्यभर अपयशच पाहिल, आणि

ज्या दानशूरतेचा सार्थ अभिमान होता

त्यापाई कवचकुंडलही गमावली

का नाही मला कृष्णाशी मैत्री करावीशी वाटली?


का नाही मी पांडवांशी जुळवून घेतले ?

कौरवांकडे राहूनही विदुरांचा पांडवांशी स्नेह होता,

मग मी का नाही त्यांच्याशी ऋणानुबंध जोडले !

बसं, आपल्या पराक्रमाच्या भ्रमात

शत्रु मात्र वाढविले.


प्रसंगी गुरूंशीही खोट बोलल़ो

ह्या सार्यापाई मिळविले काय ?

एका चांगल्या प्रगत संस्कृतीचा

पाया खचविला आणि अख्ख्या

भरतभूमीला भाऊबंदकीची भेट दिली

पराक्रमाला संयमाची जोड नसली

तर तो पराक्रम नाशाला

कारणीभूत ठरतो, ह्याच

जगात मूर्तीमंत उदाहरण ठरलो





Rate this content
Log in