STORYMIRROR

Sachin Naik

Others

4  

Sachin Naik

Others

पहिली सर

पहिली सर

1 min
11.7K


घनघोर मेघांनी आकाश व्यापिले

सोसाट्याच्या वार्याने काहूर माजविले

क्षणात चमके वीज अन्

क्षणात फाके प्रकाश

पण त्या एका क्षणानंतर

पुन्हा गडद अंधार


आतूर धरणी , आतूर क्रुषीवल

आतूर सारे हिर-रांझे

जणू त्या क्षणापूरते

सारे चातक झाले


टप.. टप.. टप.. टप..

पावसाच्या त्या पहिल्या सरीने

चेहरे सारे फुलले

मी - तू पणा जाऊनिया

हात सारे जुळले


धन्यवाद देण्याकरिता

जो जो वरती पाही

पावसाच्या सरी मध्ये

तोही भिजून जाई


Rate this content
Log in