मदन मंजिरी
मदन मंजिरी


श्यामल श्यामल वर्ण तुझा जरी
शोभून दिसे तुज खास जसा
शूर्चिभूूत ही तूूूज पाहता
याज्ञसेनी भासे मजला
श्यामल कांती श्यामल तनूही
पाठीवर कुंतल काळेभोर
हासू येता तव वदनी
प्रसन्नता पसरे सर्व भूूवनी
अन् लाजता तव मुखावरती
उषेचा पसरे लालीमा
शरीर सौष्ठव हे काय वर्णू तव
मदनमंजिरी जणू काही
अजिंठ्यातील मूर्ती जणू ही
सजीव होऊन मज पाही
तव सौंदर्याचे वर्णन करण्या
हतबल जरी मी असे
तरी तुझे सौंदर्य पाहूनी
कालीदास मज अंगी शिरे