STORYMIRROR

Sachin Naik

Tragedy

3  

Sachin Naik

Tragedy

येडा मजनू

येडा मजनू

1 min
324



‘अरे धूत तुझ्या जिंदगानीवर‘ !


मीच मला गाडून आलोय

त्या कुमारी भूमीत

जिथे कर्णाने स्वतःला जाळून घेतले --


किती अपेक्षाभंग !


एवढं काय मागितलं होत प्रिये मी

बस् फक्त एक चुंबन ?


पण ते सुद्धा कधी दिले नाहीस

एकदा वाटे, धरावा तुझा तो केशसंभार

आणि भ्रुंगा ज्याप्रमाणे कमलपुष्पातील

मध चोखतो त्या प्रमाणे ते आरक्त

ओठ चुंबून घ्यावे……जबरदस्ती

पण…


पण मी हा असा मवाळ

प्रेमात आणि युद्धात सगळ

क्षम्य असत हे फक्त पुस्तकातच…


आम्ही आपले प्रियेची मनधरणी

करण्यातच प्रेमाची इतिकर्तव्यता मानणार

आणि तिच्या होकार करिता युगानुयुगे

मजनू बनून गल्लोगल्ली हिंडत राहणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy