STORYMIRROR

Sachin Naik

Comedy

1.3  

Sachin Naik

Comedy

काकांच्या मिशा

काकांच्या मिशा

1 min
3.4K


काकांच्या मिशा पाहूनी काकू झाली पिशी
झोपताना दोघांच्या मधे ठेवली तिने उशी
उशी पाहूनी काका म्हणे मी रात्र काढू कशी !
उशी आडूनी काका विचारी, मधे का ठेवली उशी?
काल चुुंंबन देण्या ओठ दिले तर नाकात शिरली मिशी
कुशी बदलूनी काकानेे रात्र काढली कशी बशी
पहाट होताच काकांंनी पहिली काढली मिशी
चेहरा सुरेख आईन्या मध्ये दिसे बावनकशी
काकांना बिनमिशी पाहूनी काकू लाजली अशी
क्षणभर काकांंना वाटलेे, हि दिसे मधुबाला जशी

त्याग मिशीचा करूनी झाली संसाराची तिशी
परी अजूनी आठवे काकांना , ती प्यारी मिशी
पुन्हा उचल खाल्ली मनाने काका वाढवी मिशी
रोज वाढती मिशी पाहूनी काकू होई पिशी
'अरे ,धत तेरे कि' म्हणूनी काका पाही आपुली मिशी

दिवसामागून दिवस चालले काका वाढवी मिशी
मिशा पाहूनी काकांच्या खुुुश झाली मनी मावशी
सकाळ संध्याकाळ बसे ती काकांच्या पायापाशी
मनीचे काकांवर प्रेम पाहूनी काकू हसली अशी
कि, दुसर्याच दिवशी सकाळी काकांनी काढली मिशी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy