भारूड
भारूड
भारूड
सत्वर पाव गं मला I
भवानी आई ऑनलाईन पाहिल तुला ॥ धृ. ॥
सासरा सारखा चहाच मागतो I
शूगरच होवू दे गं त्याला ॥ १ ॥
सासू माझी बारीक लक्ष ठेवी |
मोतिबिंदु होवू दे तिला ॥ २ ॥
ननंद सारखी माहेरी येते I
फोन रेंज मिळो ना तिला ॥ ३ ॥
ननंदेचं पोरगं कार्टुनच पाहते |
रिमोट हाती नको लागू देवू त्याला ॥ ४ ॥
दिर माझा घरीच राहतो I
गर्ल फ्रेंड मिळू दे ग त्याला ॥ ५ ॥
आलेला पाहुणा जाई न लवकर I
घरची आठवण होवू दे त्याला ॥ ६ ॥
घरचे कुठे बाहेर न जाती |
फ्री टूर व्हावचर मिळू दे त्याला ॥ ७ ॥
दादला माझा दिस रात खपतोय |
दोन दिवस सुट्टी मिळू दे त्याला ॥ ८ ॥
सारखं उसणं मागतो बाजूचा |
भिकारीच कर ग शेजाऱ्याला ॥ ९ ॥
उधारीवाले कटकट करती |
विसरून जावोत ती उधारीला ॥ १० ॥
सगळयांचे भले होवू दे ग
पण नंबर माझाच पाहिला ॥ ११ ॥