माकडाची फजिती
माकडाची फजिती


एक सुंदर माकड
जंगलात रहायचे
झाडावर बसायचे
हूप हूप करायचे
रोज रोज कानी येई
माकडाचे हूप हूप
गावातल्या लेकरांना
त्याची मजा वाटे खूप
रान सोडून एकदा
आली गावामध्ये स्वारी
त्याच्या भोवती जमली
गावातली मुले सारी
होते प्रत्येका जवळ
मूठ भर शेंगदाणे
खाताखाता गात होते
आनंदाचे गोड गाणे
सारा प्रकार पाहिला
पाणी सुटले तोंडाला
खायासाठी शेंगदाणे
हवे होते माकडाला
उड्या मारत माकड
झाडाखाली उतरले
मुले क्षणात पळाली
कुत्रे धावतच आले
कुत्रे भुंकाया लागले
त्याची धांदल उडाली
शेंगदाणे खाण्यापायी
सारी फजितीच झाली